करण जोहरने अनन्याला केला चुकीचा स्पर्श? नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले...'अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच कसं...' Viral Video
esakal March 30, 2026 01:45 PM

VIRAL CLIP SHOWS KARAN JOHAR’S GESTURE TOWARD ANANYA PANDAY: हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. करण जोहर नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अशातच आता करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

या व्हिडिओमध्ये करणने केलेल्या एका कृतीमुळे अनन्या अस्वस्थ झाल्याचा दावा नेटकऱ्यांकडून होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते, की अनन्याचे लक्ष दुसरीकडे असताना करण जोहर मागून येतो आणि तिला कॅमे-यासमोर पोझ देण्यासाठी खुणावतो, मात्र या वेळी त्याने अनन्याला ज्या पद्धतीने स्पर्श केला, तो नेटकन्यांना खटकला आहे.

अनेक युजर्सच्या मते, करणच्या या कृत्तीमुळे अनन्या काही क्षणांसाठी अस्वस्थ दिसली. एका युजरने लिहिले, 'करण जोहरने अनन्याला उघडपणे अस्वस्थ केले आहे, हे स्पष्ट दिसतेय." तर दुसऱ्या एका दुजरने संताप व्यक्त करत विचारले, "बॉलीवूडमधील अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच वाटत नाही का? करण तुम्ही कधी सुधारणार?" नेटकन्यांनी करणच्या या कृत्तीवर अतिशय तीव प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनन्या पांडे आणि करण जोहरचा हा व्हिडिओ 'कॉल मी बे' सीझन २ च्या प्रमोशनल सोहळ्यातील होता. या व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असला तरी करणाच्या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जातय.

'बंद कर ना बे...' संजय दत्त पापाराझींवर भडकला, सोशल मीडियावर Viral Video होताच नेटकरी म्हणाले...'बोलण्याची पद्धतच...'
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.