Pune News: उत्तरपत्रिकांच्या रद्दीला पावसाची झळ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार, विद्यार्थी संघटनांकडून तीव्र नाराजी!
esakal March 31, 2026 01:45 PM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागातील उत्तरपत्रिकांची रद्दी सोमवारी झालेल्या पावसात पूर्णपणे भिजली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्याने विद्यार्थी संघटनांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

पुण्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे परीक्षा विभागातील उत्तरपत्रिका भिजल्या. परिणामी, लाखो उत्तरपत्रिका भिजल्याने व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा प्रकार विद्यापीठ प्रशासनाकडून झाला. अशाप्रकारे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम करत असल्याचा आरोप विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (आठवले गट) यांच्याकडून करण्यात आला.

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले,‘‘विद्यापीठ अध्यादेशानुसार अधिकार मंडळामार्फत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर, संबंधित उत्तरपत्रिका मूल्यमापन-पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे नियमानुसार या उत्तरपत्रिका निकाली (निरस्त) काढण्याची प्रक्रिया राबवण्यात येते.

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!

त्यानुसार, संबंधित उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून आदेश दिले आहेत. या प्रक्रियेअंतर्गत उत्तरपत्रिका ताब्यात घेण्याचे काम सुरू असतानाच, आलेल्या पावसामुळे त्यातील काही उत्तरपत्रिका भिजल्या आहेत. मात्र, या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकन यांसारख्या सर्व आवश्यक प्रक्रिया आधीच पूर्ण झालेल्या आहेत.’’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.