Solapur Madha Crime News : शेतीला पाणी देण्याच्या कारणावरुन मुलगा आणी वडिलांमध्ये बाचाबाची अन् शिविगाळ झाली होती. याचाच राग मनात धरुन बापानेच आपल्या तरण्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील रुईमध्ये समोर आला आहे. शेतीला पाणी देण्यावरुन वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाले होते. या वादात बापाला मुलाने शिव्या दिल्याचा राग आला होता. हाच राग मनात धरुन वडिलाने घरात झोपलेल्या अवस्थेतील मुलाला लोखंडी गजाने मारहाण करुन त्याची हत्या केली आहे.
याप्रकरणी मृत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन खुन केलेल्या राजेंद्र पतंगे या बापावर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरुन मुलाची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.