Team India schedule after England ODI series: भारतीय क्रिकेट संघाच्या वेळापत्रकात आणखी एक मालिका जोडली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी निवडल्या जाणाऱ्या संघात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Suryavanshi) संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचा मागील चार वर्षांतील हा झिम्बाब्वेचा तिसरा दौरा असणार आहे. भारतीय संघ २०२४ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळला होता. मागील ट्वेंटी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला होता.
सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेचा संघ टीम इंडियाचा पाहुणचार करणार आहे. त्यानंतर २०२७ मध्ये झिम्बाब्वेचा संघ तीन वन डे सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारत या तीन प्रमुख संघापैकी भारतच मागील काही वर्षात झिम्बाब्वे दौऱ्यांवर वारंवार गेला आहे. पण, २०२६ च्या सप्टेंबर महिन्या ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बाब्वेत खेळायला जाणार आहे. त्यापूर्वी इंग्लंडनेही इथे खेळायला यावे, यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...पत्रकार ट्रिस्टन त्रावले यांच्या 'क्रिकेट फायनान्शिअल जर्नल'नुसार, भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे आनंदी असून, त्यांना 'बिग थ्री' विरुद्ध कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. भारताचा झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना २००५ मध्ये झाला होता."जेव्हा जेव्हा आम्ही भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध खेळतो, तेव्हा झिम्बाब्वे क्रिकेटला मोठी चालना मिळते. जर आम्हाला त्यांच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळायला मिळाले, तर खेळाडूंसाठी ही एक उत्तम संधी असेल. कारण सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळल्यानेच त्यांच्या खेळात सुधारणा होते,” असे झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी यांनी सीएफजेला सांगितले.
जून-जुलैच्या कालावधीत, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ तब्बल १० ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ ट्वेंटी-२० संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करू शकतो. भारताच्या आयपीएल-नंतरच्या वेळापत्रकाची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या एका कसोटी सामन्याने होईल, त्यानंतर तीन वन डे सामने खेळले जातील. मग, आयर्लंडमध्ये दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर, भारत पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी इंग्लंडला रवाना होईल.