धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. माती वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने तिघांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात काका पुतण्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील नरडाणा गावाजवळ ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आले आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धुळ्यात भीषण अपघातसमोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नरडाणा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव डंपरने दोन मोटरसायकलींना धडक देत चिरडले. या अपघातात अपघातात एका मोटरसायकल वर असलेले गणेश ज्ञानेश्वर माळी (वय 22) आणि सुमीत देविदास माळी (वय 14) यांचा मृत्यू झाला. बेटावद येथे कार्यक्रमासाठी जात असताना माळी या काका पुतण्याचा अपघात झाला. तसेच दुसऱ्या मोटरसायकलवर असलेल्या सुधाकर श्रावण बडगुजर (वय 50 )यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्रापूरमध्येही अपघातयाआधी आज पुणे–अहिल्यानगर मार्गावर शिक्रापूर येथे भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पुणे–अहिल्यानगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पुणे–नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोचा अपघातत्याच बरोबर पुणे–नाशिक महामार्ग क्रमांक 60 वरील शिंदेवाडी चौकात भीषण अपघात झाला. मोठ्या स्पीड ब्रेकरवरून जात असताना आयशर टेम्पो जोरात आदळला आणि नियंत्रण सुटल्याने तो थेट विरुद्ध दिशेने गेल्याने अपघात झाला. या भीषण धडकेत टेम्पोचा केबिन पूर्णपणे चिरडला गेला असून चालक त्यामध्ये अडकून दबला गेला आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने शिंदेवाडी चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.