Delhi Capitals Clinch Victory! Sameer Rizvi & Tristan Stubbs Seal Chase vs LSG: दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC लाही बॅकफूटवर जावे लागले होते, परंतु समीर रिझवी ( Sameer Rizvi) आणि त्रिस्तान स्तब्स ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी LSGच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. दिल्लीच्या लुंगी एनगिडी व टी नटराजन यांच्यासह कुलदीप यादव या गोलंदाजांनी छाप पाडली.
DC ने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना LSG ला १८.४ षटकांत १४१ धावांवर गुंडाळले. लुंगी एनगिडी व टी नटराजन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने दोन बळी टिपले. कर्णधार अक्षर पटेलने १ बळी टिपताना एडन मार्करमचा त्रिफळा उडवला. दिल्लीकडून मिचेल मार्स ( ३५) व अब्दुल समज ( ३६) हे दोघं वगळल्यास एकाही फलंदाजाला १५ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. कर्णधार रिषभ पंत ( ७) तिसऱ्या षटकात विचित्र पद्धतीने रन आऊट झाला.
LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...अक्षरने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून देताना लखनौवर दडपण ठेवले आणि स्टार फलंदाजांची फौज असलेला लखनौचा संघ ढेपाळला. DC ची सुरुवातही काही खास झाली नाही. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर लोकेश राहुल षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. दरम्यान, आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची शमीची पाचवी वेळ ठरली. त्यानंतर प्रविण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ड, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा व पॅट कमिन्स यांनी तीनवेळा असा पराक्रम केला आहे.
त्यानंतर पथूम निसंका ( १) व नितीश राणा ( १५) यांना अनुक्रमे प्रिन्स यादव व मोहसिन खान यांनी माघारी पाठवले. दिल्लीचे ३ फलंदाज २५ धावांवर तंबूत परतले. प्रिन्सने त्याच षटकात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला. त्रिस्तान स्तब्स व समीर रिझवी ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. शाहबाद अहमदने टाकलेल्या १०व्या षटकात या दोघांनी १६ धावा कुटल्या आणि आत्मविश्वास कमावला.
रिझवीने ३८ चेंडूंत अर्धशतक झळकावताना ४ चौकार व २ षटकार लगावले आणि सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. त्याला साथ द्यायला स्तब्स होताच आणि दोघांनी ७० चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. स्तब्सने ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३९ धावांची नाबाद खेळी केली. रिझवीने ४७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७० धावा करून दिल्लीला १८व्या षटकात विजय मिळवून दिला.