जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 8 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने एक ट्रक निघाला होता. हा ट्रक भरधाव वेगात समृद्धी महामार्गावरून जात होता. याच भागात मजूर महिला काम करत होत्या. कामात गुंतलेल्या असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या मजूर महिलांना थेट उडवलं आहे. या अपघातानंतर मृतांचे मृतदेह जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार नारायण कुचे, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर या दोघांनीही तात्काळ रुग्णालयात धाव घेत मृतांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. यानंतर आता राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याच आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मदतीचा घोषणामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत माहिती देताना ट्विट करत म्हटले की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जखमींसाठी प्रार्थनाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघाताबाबत म्हटले की, जालना परिसरात समृद्धी महामार्गावर घडलेली भीषण अपघाताची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
अपघातातील मृतांची नावेजालना परिसरात समृद्धी महामार्गावर घडलेली भीषण अपघाताची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar)