सराईत दुचाकी चोराला अटक
esakal April 03, 2026 10:45 PM

दुचाकी चोरीतील सराईत अटकेत

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदरसह ठाणे, मुंबई परिसरात दुचाकी चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकाला अटक केली आहे.
भाईंदर पश्चिम भागातून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार भाईंदर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीनंतर मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या अयाज अली रहमत अली अन्सारीला दहिसर चेकनाक्याजवळून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत भाईंदर येथील गुन्ह्यासह मुंबईतील चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
-------------------------------
आठ गुन्ह्यांमध्ये दोषी
मुंबई, ठाणे शहर येथे दुचाकी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आठ गुन्ह्यांमध्ये आरोपीला न्यायालयाने दोषी घोषित केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.