राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात आयपीएल 2026 मध्ये विजयी सुरुवात केली. राजस्थानने 30 मार्चला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करुन विजयी सलामी दिली. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सवर 8 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. राजस्थानने चेन्नईकडून मिळालेलं 128 धावांचं आव्हान हे 12.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यानंतर आता राजस्थान आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 2 हात करणार आहे. गुजरात टायटन्सचाही हा या पर्वातील दुसरा सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची धुरा आहे. राजस्थानचा गुजरातला पराभूत करुन सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर गुजरातची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता गुजरात पहिला विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार की राजस्थान सलग आणि एकूण दुसऱ्या सामन्यात जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी?गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना शनिवारी 4 एप्रिलला होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.
गुजरात राजस्थानवर वरचढदरम्यान गुजरात राजस्थान रॉयल्सवर वरचढ राहिली आहे. गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात स्पर्धेच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला गुजरात विरुद्ध 2 सामन्यांतच विजय मिळवता आला आहे.