Shweta Shinde: मराठी मनोरंजन विश्वात मोजक्याच अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरच्या फार सुरुवातीला दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेची निर्मिती करणारी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) सध्या चर्चेत आलीय ती नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे. करियर, वैयक्तिक आयुष्य आणि मराठी मनोरंजनसृष्टी होणाऱ्या ग्रुपिझमवर अभिनंत्री स्पष्टच बोललीय. नेपोटिझम, वारंवार एकाच व्यक्तीला मिळणारी कामं, मालिकाविश्वामध्ये काम करताना लागणार सातत्य या सगळ्या विषयांवर तिनं मनमोकळा संवाद साधला .
छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या श्वेतानं 'लागीर झालं जी ', 'देव माणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लाखात एक आमचा दादा' या मालिकांची निर्मिती केली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये कामही केलंय.अलीकडेच भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टवर बोलताना मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपीझम विषयी भाष्य केलंय.' हेमंत ढोमेच्या (Hemant Dhome) सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते. त्यांच्यासाठी मग भूमिका लिहिल्या जातात पण तो एक कम्फर्ट झोन आहे. यात गृपिझम आणि नेपोटेसम असं काहीच नसतं ' असं तिने म्हटलं.
' कम्फर्ट झोनमुळे ग्रुपचं होतं असावं असं मला वाटतं. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर हेमंत ढोमे. हेमंतच्या चित्रपटांमध्ये सेमच स्टार कास्ट दिसते. एका पॉईंट नंतर त्याचा तो कंफर्ट झोन होत असावा. कारण त्या व्यक्तीला तू ओळखायला लागतो. त्या व्यक्तीसाठी मग भूमिका लिहिल्या जातात आणि म्हणून ते ग्रूपिझम होतं असं मला वाटतं. आता माझ्याकडे ही असे अनेक कलाकार आहेत जे प्रोजेक्ट मधून पुन्हा पुन्हा दिसतात. तो एक कम्फर्ट घेऊन निर्माण झालाय.यात रुपीझम आणि नेपोटीझम वगैरे असं काहीच नसतं." असं ती म्हणाली.
नेपोटिझमवर बोलताना श्वेता म्हणाली," नेपोटिझममुळे तुम्हाला एक संधी मिळू शकते असं मी म्हणेन. माझ्या मुलीला जर करिअर करायचं असेल तर मी एक संधी देऊ शकते. पण त्या एका संधीत तिला काही करता आलं नाही तर मग कोणी काहीही करू शकत नाही. एका संधीत तिला चमकायचं आहे. मग तेव्हा हार्ड वर्क, टॅलेंट या गोष्टींना पर्याय नाही. आलिया भट ही महेश भट्ट ची मुलगी म्हणून यशस्वी झालेली नाही.तिने स्वतःला सिद्ध केलं." असंही श्वेता म्हणाली.