आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. होम टीम दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौला लागला. कॅप्टन अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात कर्णधार बदलला आहे. पलटणने हार्दिक पंड्या याच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (डब्ल्यू), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.