Ghatnandur Accident : टेम्पोतून उडी मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
esakal April 07, 2026 12:45 AM

घाटनांदूर - दौंडवाडी (ता. परळी) येथील शेतकरी टेम्पोतून शेतीमाल लातूरला विक्रीसाठी घेऊन जात असताना खानापूर पाटी (ता. रेणापूर) जवळ टेम्पोचे मागचे टायर फुटल्याने घाबरून एका शेतकऱ्याने टेम्पोतून उडी मारल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दौंडवाडी येथील शेतकरी बाजीराव भिकाजी फड ईश्वर श्रीमंत दौंड व ज्ञानोबा नामदेव फड हे शेतीमाल टेम्पो क्रं. एमएच१२ के पी ९५६० मधून लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जात असता दरम्यान रेणापूर तालुक्यातील खानापूर पाटीजवळ टेम्पो आल्यानंतर टेम्पोचे मागचे टायर फुटल्याने टेम्पो चालक संजय बाबुराव फड याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले.

टेम्पो रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकताच टेम्पोत बसलेल्या ज्ञानोबा नामदेव फड (वय-६०) यांनी टेम्पोतून उडी मारल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. तर चालकास संजय फड, बाजीराव फड ईश्वर दौंड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे दौंडवाडी हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत ज्ञानोबा फड याच्या पार्थिव देहाचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.