Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
Tv9 Marathi April 07, 2026 12:45 AM

प्रत्येकाची अशी इच्छा असते की, आपलं आयुष्य सुखा समाधानात जावं, हातात पुरेसा पैसा असावा, बँक बॅलन्स असावं. मात्र अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो. पैसा कमावतो मात्र तो आपल्या हातात टिकत नाही. जसा पैसा आपल्या हातात येतो, तसाच तो खर्च देखील होतो. अनेकांना कर्जाची समस्या असते. काही महत्त्वाच्या कामासाठी कर्ज घेतलेले असतं, मात्र त्यानंतर ते कितीही फेडलं तरी फिटतच नाही. तर एखाद्या व्यक्तीला अचानक त्याच्या व्यवसायामध्ये तोटा होतो. या मागे अनेक कारणं असू शकतात, मात्र जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला किंवा नकारात्मक ऊर्जा वाढली तर त्यामुळे देखील अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचे असते. आज आपण ऊर्जा संतुलनाबाबत काही खास उपाय जाणून घेणार आहेत, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ऊर्जा संतुलन साधलं जाईल.

घराच्या मुख्य दरवाजाला तांब्याची घंटी लावा – जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला तांब्याची घंटी लावली तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, तसेच घरात पैशांची आवक देखील वाढते.

तिजोरीमध्ये एक हळकुंड आणि पाच बदाम ठेवा – यामुळे घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि खर्चाला आळा बसतो. अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च कमी होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

दान धर्म करा – जर तुम्ही दान धर्म केला तर घराला बरकत प्राप्त होते, घरात पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो. घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप ठेवा – घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप ठेवल्याने घरात धनाची आवक वाढते, भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं हे सर्वात प्रिय झाड आहे. जिथे तुळस असते त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची कृपादृष्टी असते.

एका लाल कापडामध्ये 11 नाणी बांधून ती पूर्व दिशेला ठेवा – यामुळे घरात समृद्धी येते, घराची भरभराट होते. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. जर कोणाकडून उधारीचे पैसे यायचे असतील तर ते देखील वसूल होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा – देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा, लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. ज्या घरात लक्ष्मी मातेची दररोज पूजा होते, त्या घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं.

घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा – घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा त्यामुळे घरात पैसा टिकून राहतो. आर्थिक प्रगती होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.