भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास
Saam TV April 07, 2026 04:45 AM

भाजपची ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना

भाजपच्या स्थापनेला ४६ वर्ष पूर्ण

भाजपच्या राजकीय इतिहासावर रविंद्र चव्हाण यांचं भाष्य

भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झालीये. याच भाजपने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केलंय. पक्षाच्या स्थापनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर लेख लिहून आपले विचार मांडलेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी भाजपचा राजकीय इतिहासही सांगितला.

'विचारधारा आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला पक्ष विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करतोय. ६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारलंय, असेही चव्हाण यांनी सांगितले.

'भाजप कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतोय, त्यावेळी मला विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले. तसेच असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवलंय, असे चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याच्या इशाऱ्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

'देशात नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता. त्यावेळी जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य आणि वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवून दिलं. त्यांची दूरदृष्टी आमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Ramavatar Jaggi Case verdict : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जन्मठेप; हायकोर्टाचा मोठा निर्णय

'पक्षावर ‘शेटजी-भटजी’ची पार्टी म्हणून टीका व्हायची. त्याच भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रात ११ बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिलेत. हे राज्यात जातीय राजकारण करणाऱ्यांना ठोस उत्तर आहे. एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळताना अभिमान वाटतोय. सामान्य कार्यकर्त्यापासून या पदापर्यंत पोहोचणे केवळ भाजपमध्येच शक्य आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.