Prime Focus Share ने कमाल केली आहे. बाजारात चढउताराचे सत्र असतानाही या शेअरने कमाल दाखवली आहे. ही पोस्ट प्रोडक्शन आणि VFX सेक्टरमधील दिग्गज कंपनी आहे. रामायण चित्रपटातील व्हिज्युएल इफेक्ट्सवर ही कंपनी काम करत आहे.
गेल्या वर्षी 7 जुलै रोजी या चित्रपटाचे पहिले टिझर रिलीज झाले. त्यावेळी हा शेअर जवळपास 160 रुपयांच्या घरात होता. तर आता 2 एप्रिल रोजी या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. या स्टॉकची किंमत आता 330 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसात हा शेअर 106 टक्क्यांनी तेजीत आला आहे.
जगावर सध्या युद्धाचे वादळ घोंगावत आहेत. रशिया-युक्रेन, आखाती युद्धाने महागाई गगनाला भिडलेली आहे. या भू राजकीय घडामोडींचा परिणाम चित्रपट निर्मितीवरही होत आहे. प्रेक्षक थिएटरपर्यंत आणणे कठीण होत आहे. तरीही या शेअरने कमाल केली आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.