नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना एका संस्कृतीचा शेवट होऊ शकतो, असा इशारा दिला होता. याला इराणकडून उत्तर देण्यात आलं आहे. आम्ही अमेरिकेला असं उत्तर देऊ ते कधी विसरु शकणार नाहीत, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना म्हटलं होतं की आज रात्री एक संस्कृती पूर्णपणे नष्ट होईल जी पुन्हा आणली जाऊ शकत नाही. यावर इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत संपली आहे म्हणत नेस्तनाबूत करण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की आज रात्री एका संस्कृतीचा पूर्णपणे शेवट होईल, ती पुन्हा आणली जाऊ शकणार नाही. या धमकीचं दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या उच्चायुक्तांकडून उत्तर देण्यात आलं आहे. तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना इराणच्या प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर दिलं जाईळ जे तुम्ही कधी विसरु शकणार नाही, असं इराणनं म्हटलं आहे.
आजच्या रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. मला असं व्हावं असं वाटत नाही, पण कदाचित तसं होईल. मात्र, आता संपूर्ण सत्ताबदल झालं आणि बुद्धिमान, कमी कट्टर विचारांचे लोक आले तर तिथे कदाचित काहीतरी क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकतं. कोण जाणे? आपण आज रात्री हे पाहू. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असेल. 47 वर्षांची भ्रष्टाचारी, खंडणीखोर मृत्यूची कारकीर्द अखेर संपेल. इराणच्या महान जनतेवर देवाची कृपा असो!, अशी धमकी इराणला ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे.
अमेरिकेला इराणच्या झिम्बाब्वेच्या उच्चायुक्त कार्यालयाकडून देखील उत्तर देण्यात आलं आहे. या उच्चायुक्त कार्यालयाकडून मिनाबमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या शोकग्रस्त आईचा फोटो शेअर केला आहे. इराणनं म्हटलं की हे दु:ख, राग आणि चेहऱ्यांना लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, असं इराणच्या उच्चायुक्त कार्यालयानं म्हटलंय.
Trump told: “A whole civilization will die tonight”.
— Iran Embassy SA (@IraninSA) April 7, 2026
You and your allies will suffer an unforgettable hit from the ancient civilization of Iran.