Hardik Pandya post match reaction MI vs RR IPL 2026: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सचा संघ गुवाहाटीच्या मैदानावर सर्व आघाड्यांवर MI वर भारी पडले. ११-११ षटकांच्या या सामन्यात RR ने १५० धावांचा डोंगर उभा केला आणि त्याच्या प्रत्युत्तरात मुंबईला ९ बाद १२३ धावाच करता आल्या. राजस्थानने २७ धावांनी हा सामना जिंकला आणि आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या पराभवानंतर हार्दिक पांड्या ( Mumbai Indians Captain) संतापला..
यशस्वी व वैभव सूर्यवंशी यांनी राजस्थानला आक्रमक सुरूवात करून देताना ५ षटकांत ८० धावा फलकावर चढवल्या. वैभव १४ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ३९ धावांवर माघारी परतला, यशस्वीने ३२ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची नाबाद खेळी केली. रियान परागने २० धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून नमन धीर ( २५) व शरफान रदरफर्ड ( २५) यांनी सर्वाधिक धावा केल्या. राजस्थानच्या नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video हार्दिक पांड्याने गोलंदाजांवर फोडलं खापर...हार्दिक पांड्या म्हणाला, " पॉवरप्लेमध्ये आम्ही ज्या प्रकारे चेंडू टाकणे अपेक्षित होते, तसे आम्ही टाकले नाहीत आणि त्यांनी मात्र चांगली फलंदाजी केली. मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गोलंदाजांची कामगिरी अजिबातच अपेक्षित दर्जाची नव्हती; उलट राजस्थानने मात्र जबरदस्त क्रिकेट खेळले. या सामन्याच्या निकालाचे खापर मी फलंदाजीवर फोडणार नाही. ही नक्कीच गोलंदाजी विभागाची जबाबदारी होती, जी त्यांनी पार पाडायला हवी होती. हे ट्वेंटी-२० क्रिकेट आहे, यात नेहमीच 'मोजके योग्य चेंडू' टाकणे महत्त्वाचे असते."
"आजच्या सामन्यात २७ धावांनी हार पत्करावी लागली, म्हणजे जर आम्ही पाच चांगले चेंडू टाकले असते, तर हा २७ धावांचा फरकही राहिला नसता. जर आम्ही ते योग्य चेंडू अचूकपणे टाकले असते, तर आम्ही नक्कीच सामन्यात टिकून राहिलो असतो. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या सलामीच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच आमच्यावर दडपण आणले आणि आम्हाला सामन्यातूनच बाहेर फेकले. त्यानंतर संपूर्ण सामन्यात आम्ही केवळ पिछाडी भरून काढण्याचाच प्रयत्न करत राहिलो आणि अखेरीस, आम्ही कमी पडलो," हे हार्दिकने मान्य केले.
IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List वैभव सूर्यवंशीचं कौतुक...हार्दिकने यावेळी वैभवचे कौतुक केले. तो म्हणाला, "१७ किंवा १६ वर्षांचा एक मुलगा ज्या प्रकारे फलंदाजी करतो, ते पाहणे खरोखरच वेधक आहे. सामन्याच्या तयारीदरम्यान आम्ही त्याच्याबद्दल बरीच चर्चाही केली होती. त्यामुळे हो, त्याची फलंदाजीची शैली, त्याच्या अंगी असलेला निर्भयपणा आणि तो ज्या प्रकारचे फटके खेळतो, ते पाहणे खरोखरच अप्रतिम आहे. त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी मी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील सामन्यात RCB चा सामना करायचा आहे आणि त्याआधी आमच्या चुकांमधून धडा घ्यायचा आहे. चुकांमधून शिका आणि पुढील सामन्यासाठी चांगली तयारी करा."