DC vs GT Live Streaming : गुजरातसमोर दिल्लीचं आव्हान, सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखणार?
Tv9 Marathi April 08, 2026 06:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) बुधवारी 8 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. दिल्ली या मोसमात अजिंक्य आहेत. ऑलराउंडर अक्षर पटेल याच्या नेतृत्वात दिल्लीने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्लीने आपल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. गुजरातला आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सने पराभूत केलं आहे. त्यामुळे गुजरातसमोर आपल्या तिसऱ्या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळून दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे गुजरात दिल्लीला कडवं आव्हान देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  या निमित्ताने दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना बुधवारी 8 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

दिल्ली कॅपिट्ल्स घरच्या मैदानात गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघातील सामना राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मॅच लाईव्ह पाहता येईल.

दोन्ही संघ तुल्यबळ!

दिल्ली विरुद्ध गुजरात यांच्यातील आकडे पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 7 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने 3 वेळा विजय मिळवला आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर गुजरात नवव्या स्थानी विराजमान आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.