सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
डॉ. कृष्णा केंडे April 09, 2026 09:13 PM

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने भर दिवसा पेट्रोल पंपावर पत्नीला संपवल्याची घटना घडली आहे. सोबत राहत नसल्याच्या रागातून वाद दोघांमध्ये वाद होता. तसेच  सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार होता, याच कारणातून पतीने पत्नीला संपवल्याने छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे. सत्यम गवांडे असं आरोपीचं नाव आहे.  या घटनेनंतर करमाड पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात घेतलं ताब्यात 

छत्रपती संभाजीनगर मध्ये आज एक धक्कादायक घटना समोर आली. करमाड परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पूजा गवांडे या महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण चाकूने वार करत सत्यम गवांडे याने पत्नीला संपवलं आहे. मृत महिलेचे अगोदर लग्न झालेले होते  तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर मृत महिलेने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदीच्या मंदिरात काही महिन्यान अगोदर लग्न केले. मात्र लग्नानंतर हे दोघे सोबत राहत नव्हते, सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे होते. त्यासाठी तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता, मात्र पूजाने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला त्यातूनच त्याने पूजाला संपवले. त्यानंतर करमाड पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच सत्यम आणि पूजा यांच्यात खटके उडू लागले होते

या घटनेतील मृत पूजा गावंडे यांच्या आयुष्याचा प्रवास संघर्षाचा होता. पूजा यांच्या पतीचे काही काळापूर्वी निधन झाले असून त्यांना 2 लहान मुले देखील आहेत. पतीच्या निधनानंतर पूजा यांचा संसार सावरण्यासाठी साधारण 6 महिन्यापूर्वी त्यांचे लग्न त्यांचा चुलत दीर सत्यम गावंडे याच्याशी लावून देण्यात आले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर काही दिवसांतच सत्यम आणि पूजा यांच्यात खटके उडू लागले आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यम गावंडे याला दुसरे लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पूजा यांच्याकडून अधिकृतपणे घटस्फोट हवा होता. सत्यम गेल्या काही दिवसांपासून पूजा यांच्याकडे घटस्फोट देण्यासाठी सतत तगादा लावत होता आणि त्यांच्यावर दबाव टाकत होता. मात्र, आपल्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून पूजा घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हती. हाच राग सत्यमच्या मनात धुमसत होता आणि त्याने पूजा यांचा काटा काढण्याचे ठरवले.

धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.