रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात लग्न लावून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन एजंटांनी भावनिक जाळ्यात अडकवून ही लूट केल्याचं समोर आलं असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीलापन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील प्रवीण अतिग्रे या तरुणाला लग्न जमवून देतो असं सांगत आरोपी पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांनी संपर्क साधला. एका मुलीचा फोटो दाखवून लग्न ठरल्याचा बनाव करण्यात आला. यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणं देत पैशांची मागणी सुरू केली. मुलीचेवडील नसल्याने तिच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील, असा भावनिक आधार घेत सुरुवातीला मोठी रक्कम उकळण्यात आली.
Nashik Blackmailing Case News | पोलिसांनी रंगेहात पकडून दोघांनी केली अटक, धक्कादायक बाब समोरत्यानंतर मुलीच्या मामाला पैशांची गरज असल्याचं सांगत पुन्हा पैसे घेतले. इतकंच नाही तर दागिने सोडवण्यासाठी 15 हजार रुपये आणि लग्नाच्या बस्त्यासाठीही खर्च प्रवीणकडूनच करून घेण्यात आला. अशा प्रकारे एकूण 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. काही दिवसांनी मुलीने लग्नास नकार दिल्याचं सांगत आरोपींनी हात झटकले. त्यामुळे संशय आल्याने प्रवीण अतिग्रे यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Novel: 'ते पन्नास दिवस' पुस्तकाचा वाद काय? अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमातून का हटवली कादंबरी?पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून या टोळीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू आहे. लग्नाच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.