Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
GH News April 10, 2026 01:11 AM

व्हिटामिन्स डीच्या कमतरतेने केवळ शरीरातील हाडांसंबधित समस्या निर्माण होत नाहीत तर मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. नव्या संशोधनानुसार या डी व्हिटामिनच्या कमतरतेने मेंदू वय वेगाने वाढते. त्याचा नव्हर्स सिस्टीमवर देखील परिणाम होतो. विस्मृतीचा आजार होण्याचा धोका देखील वाढतो. संशोधनात एका खास वयोगटातील व्यक्तींना याचा मोठा धोका असतो असे म्हटले आहे.

अमेरिकन एकेडमी ऑफ न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार ३० ते ४० वयात व्हिटामिन डी ची कमतरता मेंदूचे वय वाढण्याचे कारण बनू शकते. या व्हिटामिन्सच्या कमतरतेने एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता प्रभावित होण्याची रिस्क वाढते. व्हिटामिन्स डीच्या कमतरतेने मेंटल हेल्थवर देखील परिणाम होतो. यामुळे एंग्जाईटी आणि डिप्रेशनचा धोका देखील वाढू शकतो.

व्हिटामिन डीच्या कमतरतेचे ब्रेनशी कनेक्शन काय ?

संशोधनानुसार व्हिटामिन डी मेंदूच्या पेशींना आरोग्यदायी राखण्यास मदत करते. जेव्हा शरीरात या व्हिटामिनची कमतरता होते तेव्हा यावर परिणाम होऊ लागतो. यामुळे ब्रेन एजिंगपासून ते अन्य समस्या निर्माण होऊ लागतात. याचा जास्त परिणाम ज्यांच्या शरीरात व्हिटामिन्स डीची पातळी कमी आहे त्यांना होतो. जे लोक जास्त वेळ ऑफीसमध्ये बसून काम करतात त्यांनाही याचा त्रास होतो.

या वयोगटातील लोकांना जास्त धोका –

या अभ्यासात २५ ते ५० वयोगटातील लोकांचा समावेश केला गेला होता. यात आढळले की ते ३० ते ४० या वयातील लोकांमध्ये व्हिटामिन्स डीची कमतरता आहे. या लोकांना योग्य डाएट फॉलो करण्याचा ट्रेंड नाही. यातील अनेक लोक उन्हात फिरत नाहीत. जेव्हा शरीरात याची कमतरता होते, तेव्हा न्यूरॉन्स वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे वयाच्या वाढी सोबत मानसिक क्षमतेत वेगाने घसरण होत जाते.

काय करावे ?

रोज काही वेळ उन्हात जरुर घालवाला. दूध आणि अंड्यांचा डाएटमध्ये समावेश करावा. व्हिटामिन डीच्या कमतरतेच्या लक्षणावर लागलीच लक्ष द्यावे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटची सुरुवात करावी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.