डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
GH News April 10, 2026 01:14 PM

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला एकही देश पुढे येत नसताना शेवटी पाकिस्तानला त्यांनी युद्धबंदी कराराकरिता पुढे घातले. होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेवर मोठा दबाव आहे. हेच नाही तर होर्मुज खाडी खुली झाल्यावर जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर होतील, असा दावा त्यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धात एकटे पडल्याचे बघायला मिळाले. एकही देश त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनही मोठा विरोध होताना दिसत आहे. अमेरिकेच्या लोकांना युद्ध पाहिजे नाही. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बघायला मिळत आहे. जगातून डोनाल्ड ट्रम्प  यांच्यावर रोष व्यक्त होत आहे. काहीही कारण नसताना आम्हाला या युद्धाचा परिणाम भोगावा लागत असल्याचे अनेक देशांचे म्हणणे आहे. अमेरिकेने इराणसोबत युद्ध सुरू करून जगाला संकटात ढकलले.

आता युद्धबंदी कराराकरिता बैठक असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याघरातून मोठा धक्का बसू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी एपस्टाईन फाईल्सचे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच त्यांनी एपस्टाईल फाईल्सवर मोठा खुलासा केला. त्यांनी केलेल्या या विधानांनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

जेफ्री एपस्टाईन यांच्याशी संबंधित अफवांवर हल्लाबोल मिसेस ट्रम्प यांनी पीडितांच्या सुनावणीची मागणी केली आहे. यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या देशांतर्गत अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या घरातूनच हा मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण या प्रकरणात सतत डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव येताना दिसत आहे.

त्यामध्येच आता मिसेस ट्रम्प यांच्याकडून या प्रकरणात पीडितांच्या सुनावणीची मागणी करण्यात आली. जर असे झाले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्येत वाढ होऊ शकते. 9 एप्रिल 2026 रोजी त्यांनी यावर विधान करत म्हटले की, लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरलेल्या आणि आता मृत झालेल्या जेफ्री एपस्टाईनबद्दलचे सर्व खोटे अहवाल आणि अफवा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. या अफवांमध्ये त्यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न असून हा प्रकार तात्काळ थांबवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.