आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सोमवारी 13 एप्रिलला 2 चॅम्पिन्स संघ आमनेसामने असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात एकूण आणि सलग 4 सामने जिंकले आहेत. तर इशान किशन त्याच्या नेतृत्वात हैदराबादला 4 पैकी फक्त एकाच सामन्यात विजयी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हैदराबादसमोर राजस्थानचा विजयरथ रोखून विजयी ट्रॅकवर परतण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे आता हैदराबाद कमबॅक करत सामना जिंकणार की राजस्थान सलग पाचवा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी?हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना सोमवारी 15 एप्रिलला होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मॅच लाईव्ह पाहता येईल.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थितीराजस्थान अजिंक्य आहे. राजस्थानने खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. तर राजस्थानचा नेट रनरेट हा +2.055 असा आहे. तर हैदराबादला 4 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. हैदराबाद 2 गुणासंह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा -0.024 असा आहे.