MI vs RCB, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रविवारी सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने १८ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli - Rohit Sharma) हे भारताचे दोन मोठे स्टार आमने-सामने होते. त्या दोघांचा एक खास व्हिडिओही सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.
IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिकया सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली.
यावेळी जेव्हा विराट आणि सॉल्ट फलंदाजीसाठी मैदानात आले, त्यावेळी विराटला अचानक त्याच्या मागे रोहित असल्याचे दिसला. त्यावेळी तो लगेचच रोहितकडे गेला. त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चाही झाली. त्यानंतर विराट पुन्हा फलंदाजीसाठी गेला. विराटने ज्याप्रमाणे वेळ काढून रोहितची भेट घेतली, त्याचे कौतुक होत असून हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, दुसऱ्या डावात बंगळुरूने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन सलामीला फलंदाजीला उतरले. पण ६ व्या षटकात रोहित हॅमस्ट्रिंगच्या वेदनेमुळे १९ धावांवरच रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर तो फलंदाजीला आला नाही.
मुंबईसाठी शेफरेन रुदरफोर्डने ३१ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी करत झुंज दिली. पण आधी मुंबईने प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स लवकर गमावल्या. त्यामुळे मुंबईला २० षटकात ५ बाद २२२ धावा करता आल्या.
या डावात विराट कोहलीही घोट्याच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. पण त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याची शक्यता आहे.
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलंया सामन्यात विराटने अर्धशतकी खेळीही केली. त्याने ३८ चेंडूत ५० धावा करताना फिलिप सॉल्टसोबत १२० धावांची भागीदारी केली. सॉल्टने ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७८ धावा केल्या. तसेच त्याने कर्णधार रजत पाटिदारसोबत ६५ धावांची भागीदारी केली. पाटिदारने २० चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तसेच टीम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुने २० षटकात ४ बाद २४१ धावा केल्या.