दुबई: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडक पटकावण्याची किमया करून दाखवली. सलामी फलंदाज संजू सॅमसन याने अखेरच्या तीन लढतींत अर्धशतकी खेळी साकारत मोलाचा वाटा उचलला. आयसीसीकडून त्याने केलेल्या देदीप्यमान कामगिरीची पोचपावती मिळाली आहे.
मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.आयसीसीच्या मासिक पुरस्कारासाठी संजू सॅमसनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर तो भावुक झाला. याप्रसंगी तो म्हणाला की, आयसीसी पुरस्कार जिंकणे ही एक अविश्वसनीय भावना आहे.
विशेषतः माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अविस्मरणीय टप्प्यात हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही औरच आहे. टी-२० विश्वकरंडक पटकावणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असणे हे स्वप्न साकार होण्यासारखेच आहे.
Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूतसंजू सॅमसन पुढे म्हणतो की, भारतीय क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे, ज्यात सर्वच स्तरांवर प्रचंड प्रतिभा आहे. मला मिळालेल्या संधींबद्दल, तसेच माझ्या संघसहकाऱ्यांनी आणि प्रशिक्षक वर्गाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे.या प्रोत्साहनामुळे मला सर्वोत्तम कामगिरी करता आली.
Buldhana News: शॉर्ट सर्किटमुळे दोन एकरातील मका जळून खाक; ठिबकसह पाईप ही जळाल्याने लाखोचे नुकसान पाच महिन्यांत पाच देशांच्या खेळाडूंचा सन्मानमागील पाच महिन्यांमध्ये पाच विविध देशांच्या खेळाडूंचा मासिक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा सिमॉन हार्मर, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, न्यूझीलंडचा डॅरेच मिचेल व पाकिस्तानचा साहिबजादा फरहान यांचाही मागील चार महिन्यांमध्ये मासिक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.