धडाकेबाज फलंदाजीचा पाया असलेला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ आजच्या आयपीएल सामन्यात लखनौ संघाचा सामना करण्यास सज्ज आहे. रविवारच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केल्यामुळे बंगळूर फलंदाजाचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला आहे.
विराट कोहली हा बंगळूर संघाचा प्रमुख चेहरा असला तरी त्यांचे सर्वच फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे एखादा फलंदाज लवकर बाद झाला तरी त्याची चिंता त्यांना नसते.
IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?१० तारखेला झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला, परंतु इम्पॅक्ट खेळाडू म्हणून व्यंकटेश अय्यर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. इतकी खोली त्यांच्या फलंदाजीत आहे.
स्ट्राइक रेटच्या बाबतीत बंगळूर संघाचे सर्वच फलंदाज सरस आहेत. रविवारी वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीचा अपवाद मात्र ठरला होता. तरीही त्याने १४० च्या स्टाइक रेटने अर्धशतक केले होते, परंतु त्याच्यासाठी हे अर्धशतक संथ होते, म्हणून बाद झाल्यानंतर विराटने सीमारेषेवर गेल्यावर हेल्मेट आणि ग्लोव्ज फेकून दिले होते.
विराट कोहली (१६२), फिल साल्ट (१७८), रजत पाटीदार (२१४), टीम डेव्हिड (२२१) आणि देवदत्त पडिक्कल (२०१) यांनी चार सामन्यांतूनच एवढ्या धावा केलेल्या आहेत. या पाच फलंदाजांनी मिळून चार सामन्यांतून तब्बल ५२ षटकार मारले आहेत. या आयपीएल मोसमातील आत्तापर्यंतच्या सामन्यांतील हा विक्रम आहे.
परिणामी बंगळूरचा संघाने दोनशेपेक्षा कमी धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात लखनौ संघाला द्विशतकी किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य पार करण्याचे किंवा प्रथम फलंदाजी केली, तर किमान सव्वादोनशेच्या पलीकडे धावा त्यांना कराव्या लागतील.
१२ एप्रिल रोजी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात लखनौ संघाला प्रथम फलंदाजीत आठ बाद १६४ धावाच करता आल्या होत्या. त्यांच्या आदल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा मुकुल चौधरी गुजरातविरुद्ध अपयशी ठरला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात रिषभ पंतच्या लखनौ संघाला फलंदाजीतील कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात २४० धावांचा डोंगर उभा करून आणि त्यानंतर मंबई संघाची पाच बाद १५४ अशी अवस्था करूनही बंगळूरला केवळ १८ धावांच्या विजयाचे समाधान मिळाले होते. शेरफेन रुदरफर्ड याने ३१ चेंडूंत ७१ धावांची खेळी करून बंगळूर संघाच्या तोंडचे पाणी काही क्षणासाठी पळवले होते. उद्याच्या सामन्यात लखनौ संघाकडून अशी एकहाती कामगिरी करण्याची क्षमता दाखवली, तर लखनौला विजयाची आशा बाळगता येईल.
IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने 'डाव' टाकला; MI च्या माजी गोलंदाजाला ताफ्यात घेतले, Ishan Kishan ची विकेट काढलीय रिषभ पंतच्या स्ट्राइक रेटची चिंताआता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतचा स्ट्राइक रेटही चिंता करणारा आहे. चार सामन्यांतून त्याच्या स्ट्राइक रेट १३० एवढाच आहे. मिचेल मार्श, एडेन मार्करम, निकोलस पूरन यांनाही मॅचविनिंग कामगिरी करता आलेली नाही.
संभावित प्लेइंग इलेव्हन (इम्पॅक्ट प्लेअरसहीत)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम, जेकब डफी/जोश हेजलवुड, सुयश शर्मा
लखनौ सुपर जायंट्स: एडन मार्कराम, मिचेल मार्श, ऋषभ पंत, आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे/ॲनरिक नॉर्टजे, मोहम्मद शमी, आवेश खान/मोहसीन खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव/मयंक यादव