Gold Price Today : सोन्याचा मोठा U-टर्न ! सराफा बाजारात मोठी उलथापालथ, सोन्याचे दर तब्बल…
Tv9 Marathi April 15, 2026 01:45 PM

Gold Rate Today In India : भारतात बहुतांश व्यक्ती या सोनं-चांदीच्या खरेदीत खूपच इंटरेस्टेड असतात. वेगवेगळ्या डिझाइनचे सोन्याचे, चांदीचे दागिने घालण्यात लोकांना खूप रस असतो. मात्र गेल्या काही महिन्यांत सोनं-चांदीच्या दरांनी एवढी उसळी घेतली की ते खरेदी करण्याचा विचार स्वप्नवत वाटू लागला. आंतरराष्ट्रीय बाजार, स्तारवार घडणाऱ्या घडामोडींचा सोनं-चांदीच्या दरावर लगेच परिणाम होतो, देशांतर्गतही सोन-चांदीच्या किमती लगेच वरखाली होतात.

एका दिवसाच्या घसरणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक चांगलीच वाढली आहे, तर चांदी मात्र स्वस्त झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 10 रुपयांनी आणि 22 कॅरेटचे 10 ग्रॅ सोनंही 10 रुपये दराने वाढलं आहे. दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1480 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1360 रुपये स्वस्त झाले होते. आता, आज दिल्लीत चांदी स्वस्त झाली आहे. दिवसभराच्या स्थिरतेनंतर, आज चांदीचा भाव प्रति किलो 100 रुपयांनी घसरला आहे.

प्रमुख शहारतील सोन्याचे दर 

आज बुधवार, 15 एप्रिल रोजी भारतातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घेऊया.

शहर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 
दिल्ली ₹1,54,090 ₹1,41,260 ₹1,15,610
मुंबई ₹1,53,940 ₹1,41,110 ₹1,15,460
कलकत्ता ₹1,53,940 ₹1,41,110 ₹1,15,460
चेन्नई ₹1,55,140 ₹1,42,210 ₹1,18,660
बंगळुरू ₹1,53,940 ₹1,41,110 ₹1,15,460
हैदराबाद ₹1,53,940 ₹1,41,110 ₹1,15,460
लखनऊ ₹1,54,090 ₹1,41,260 ₹1,15,610
पाटणा ₹1,53,990 ₹1,41,160 ₹1,15,510
जयपुर ₹1,54,090 ₹1,41,260 ₹1,15,610
अहमदाबाद ₹1,53,990 ₹1,41,160 ₹1,15,510

एक दिवसाच्या स्थिरतेनंतर चांदीची किंमत घसरली

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, दिवसभराच्या स्थिरतेनंतर आज तिचा भाव खाली आला आहे. यापूर्वी 13 एप्रिल रोजी एक किलो चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. आज दिल्लीत ती 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2,54,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर प्रमुख महानगरांबद्दल सांगायचं झालं तर, मुंबई आणि कलकत्ता येथे चांदी याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव 2,65,100 रुपये आहे, म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

पुढे कसे असतील चांदीचे दर ?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस या ब्रोकरेज फर्मचे प्रणव मीर यांनी अलीकडेच सांगितलं की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले इराण-अमेरिका युद्ध हे सोनं आणि चांदीचे दर, त्यातील चढउतार निश्चित करेल. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी अयशस्वी ठरल्या आहेत, ज्यामुळे युद्धाबद्दलची अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, सोनं आणि चांदीच्या किमतींमधील अस्थिरता कायम राहू शकते. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संवादाचा मार्ग पुन्हा खुला झाल्याने सोन्याला गती मिळाली आहे, तर चांदीवर सध्या नफावसुलीचा दबाव आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.