वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तरप्रदेशच्या नोएडामये कर्मचारी पुन्हा कामावर परतू लागले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी शहरात हिंसा, आक्रोशपूर्ण निदर्शनानंतर बुधवारी शांतता राहिली. कारखाने सुरू झाले असून कर्मचारी कामावर परतले आहेत. कुठल्याही प्रकारच्या हिंसेची शक्यता पाहता शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागांमध्ये देखरेख ठेवली जात आहे.
याचदरम्यान भ्रामक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राजद प्रवक्त्या प्रियांका भारती आणि कंचन यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोशल मीडियावर भ्रामक व्हिडिओ शेअर करत नोएडातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या दोघींवर आहे. दोघींनी शेअर केलेला व्हिडिओ प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील होता आणि तो अत्यंत पूर्वीचा होता. परंतु त्यांनी हा व्हिडिओ नोएडातील असल्याचा दावा केला होता.