पंचांग -
शुक्रवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.१७ सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी ६.३२ चंद्रास्त सायंकाळी ६.५१, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती सायं. ५.२२, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४८.
दिनविशेष -
२००१ - अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आणि टेक्नॉलॉजीमधील प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ‘माल्कम आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर.
२००८ - नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत, प्रचंड बंदोबस्तात बीजिंग ऑलिंपिक ज्योतीचा भारतातील प्रवास पूर्ण.
२०१६ - स्पेनच्या राफेल नदालने मॉँटे कार्ले टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सच्या गेल मोंफिसवर विजय मिळविला.