नराधमांना मोक्का लावा, अन्यथा तीव्र आंदोलन! काँग्रेस नेत्याचा पोलीस प्रशासनाला इशारा
Saam TV April 17, 2026 10:45 AM

Yashomati Thakur SIT demand details : अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. दरम्यान, या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदारभाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) व आयजी (अमरावती रेंज) यांची भेट घेतली. यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

TCS नंतर Lenskart मध्ये 'ड्रेस कोड'वरून वाद; हिजाब चालतो, पण टिकली लावण्यावर बंदी? CEO ने दिले स्पष्टीकरण

"अचलपूरमधील ही घटना माणुसकीलाकाळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला.

अमोल मिटकरी पुन्हा आमदार होणार? राष्ट्रवादीच्या वाट्याला विधान परिषदेच्या किती जागा?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.