'पहिलं ब्रेकअप अन् तो 'प्लेबॉय' बनला"; अमरावती व्हिडीओ व्हायरल प्रकरणील मास्टरमाईंड अयान अहमदचे पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे
अंकिता खाणे April 17, 2026 04:13 PM

परतवाडा (अमरावती): अमरावती येथील तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, या प्रकरणाचा मास्टरमाईंड (Amravati Crime News) अयान अहमद याने पोलीस चौकशीत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक खुलासे केले आहेत. "पहिल्या ब्रेकअपमुळे मी 'प्लेबॉय' बनलो," (Amravati Crime News) असे अयानने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले आहे. हे कोणतेही मानसिक आजाराचे प्रकरण नसून, एका विशिष्ट किशोरवयीन मानसिकतेतून आणि बदलेल्या जीवनशैलीतून घडलेला प्रकार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.(Amravati Crime News)

Amravati Crime News: सोशल मीडियाचा वापर करून तरुणींना जाळ्यात ओढले

पोलिस तपासातून समोर आले की, अयान अहमद हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय होता. त्याचे १८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो 'इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर' म्हणून पेड जाहिरातींमधून (Paid Promotions) चांगले पैसे कमवत होता. त्याचा मोबाईल विक्रीचा व्यवसायही जोरात सुरू होता. मात्र, हायफाय लाईफस्टाईल आणि मुलींवर पैसे उधळण्याची हौस भागवण्यासाठी तो मित्र आणि कुटुंबाकडून सतत पैसे उसने घ्यायचा. आपल्या भपकेबाज सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून तो मुलींना आकर्षित करत होता अशी माहिती देखील समोर आली आहे. (Amravati Crime News)

अयान सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधायचा. त्यानंतर चार ते पाच महिने त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा का मुलीचा विश्वास बसला की, तो त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा किंवा त्यांना लैंगिक संबंधांसाठी भाग पाडायचा. अनेक तरुणींना त्याने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अयान अहमद हा 'एमआयएम' (AIMIM) पक्षाच्या अमरावती युनिटचे सोशल मीडिया हँडल सांभाळत होता. मात्र, या प्रकरणातील त्याचे नाव समोर येताच आणि त्याच्या कृत्यांची माहिती मिळताच पक्षाने त्याला पदावरून हटवून त्याची हकालपट्टी केली आहे. (Amravati Crime News)

Amravati Crime News: पोलीस तपास सुरू

अयानच्या हायफाय लाईफस्टाईलमागे आणि या ब्लॅकमेलिंग प्रकरणामागे अजून कोणाचे हात आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि चॅट्सवरून अनेक पीडित तरुणींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.