85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 17, 2026 04:13 PM

Godfather Fame Actor Al Pacino Life Story: असं म्हटलं जातं की, वयात काय ठेवलंय? ते तर फक्त आकडे असतात... हेच वाक्य सिनेसृष्टीच्या एका दिग्गज सुपरस्टारबाबत (Superstar Actor) मात्र तंतोतंत खरं ठरतं. या प्रसिद्ध सुपरस्टारचं वय 83 वर्ष, तर तब्बल 54 वर्षांनी लहान त्याची लाईफपार्टनर. बरं एवढंच नाहीतर, दोघांना दोन वर्षांचं एक मूलही आहे. ऐकून थबकलात ना? आम्ही ज्या दिग्गज सुपरस्टारबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, हॉलिवूडचा 'गॉडफादर' (Hollywood's Godfather) दिग्गज अभिनेता अल पचीनो (Al Pacino). अभिनेते अल पीचीनो (Hollywood Actor Al Pacino) स्वतः 85 वर्षांचे आहेत, तर त्यांची पत्नी 32 वर्षांची आहे आणि हे दोघेही मिळून त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा सांभाळ करत आहेत. अल पचीनो (Al Pacino) यांनी, हॉलिवूडचा (Hollywood News) प्रसिद्ध गाजलेला सिनेमा 'गॉडफादर'मध्ये मुख्य भूमिका साकारलेली. याव्यतिरिक्त त्यांची स्कारफेस (Scarface) फिल्मही गाजलेली. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या याच सिनेमावर बॉलिवूडमध्ये 'अग्नीपथ' सिनेमा तयार करण्यात आलेला. 

53 वर्षांनी लहान असलेल्या पार्टनरसोबत थाटलाय संसार (Al Pacino Life Story)

प्रसिद्ध अभिनेते अल पचीनो यांचे पार्टनर नूर अलफल्लाह (Noor Alfallah) त्यांच्याहून 53 वर्षांनी लहान आहे. अल पचीनो सध्या 85 वर्षांचे आहेत, तर नूर अलफल्लाह 32 वर्षांची आहे. दोघांच्या वयात असलेलं एवढं मोठं अंतर लक्ष वेधून घेतंय. दरम्यान, दोघेही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं सार्वजनिकपणे बोलताना दिसत नाहीत. हॉलिवूडमधील काही मोजक्या कलाकारांपैकी अल पचीनो हे एक आहेत, ज्यांनी कधीच लग्न केलं नाही. लग्न ही संकल्पना स्वतःसाठी योग्य नसल्याचं त्यांचं मत आहे. पण, त्यांचे अफेअर्स मात्र खूप आहेत आणि याच अफेअर्समधून आतापर्यंत ते चार मुलांचे वडील झाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prime Movies (@primemovies)

पाच दशकांहून अधिक काळ गाजवली सिनेसृष्टी (Al Pacino Movies) 

अल पचीनो (Al Pacino Movies) यांनी 5 दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, कधी रस्त्यावर तर कधी थिएटरमध्येच झोपून त्यांनी दिवस काढले. मात्र अभिनयावरील प्रचंड प्रेम आणि अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाच्या शिखरावर मजल मारली.

1970 च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयातला वेगळेपणा आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ते इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांमध्ये गणले जाऊ लागले. आजही त्यांना दिग्गज अभिनेता म्हणून मानलं जातं. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेंट ऑफ अ वूमन' या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळालेला. त्यावेळी त्यांचं वय 52 वर्ष होतं.

अभिनयाचे जादूगार, अभिनेते अल पचीनो

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये इटालियन-अमेरिकन कुटुंबात जन्माला आलेले अल पचीनो यांनी थिएटरपासून सुरुवात केली आणि लवकरच 'द गॉडफादर' सीरिजमध्ये मायकल कोरोलियोने ही भूमिका साकारुन जगभरात लोकप्रिय झाले. त्यानंतर 'स्कारफेस', 'हीट', 'सेंट ऑफ ए वुमन' यांसारख्या फिल्म्समध्ये त्यांच्या अभिनयानं पुरस्कारांसोबतच लोकप्रियताही मिळवली. नुकतेच ते गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह हिच्यासोबत प्री-ऑस्कर पार्टीमध्ये दिसलेले. 

अल पचीनो यांची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह कोण?

नूर अलफल्लाह एक फिल्म प्रोड्युसर असण्यासोबतच कुवेतच्या अमेरिकन श्रीमंत कुटुंबातून आहे. तिच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं तर, अल पचीनो यांच्यापूर्वी तिनं 74 वर्षांचे इंग्लीश रॉकस्टार आणि महान गायक मॅक जॅगरला डेट केलंय. तिनं मिकसोबतच्या डेटिंग अफवांबाबत पुष्टी करताना म्हटलेलं की, "वय माझ्यासाठी महत्त्वाचं नाही..."

मीडिया रिपोर्टनुसार, नूरनं पन्नाशीचे अब्जाधीश समाजसेवक निकोलस बर्गग्रेन यांनाही डेट केलं होतं. तसेच, तिचं नाव अभिनेते-दिग्दर्शक क्लिंट ईस्टवुड यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. त्यावेळी क्लिंट ईस्टवुड 88 वर्षांचे होते, तर नूर केवळ 23 वर्षांची होती. मात्र, त्या अफवांवर पडदा टाकताना नूरनं क्लिंट यांना फक्त 'फॅमिली फ्रेंड' असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Asha Bhosle Son In Law: आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.