Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: सहा सामने, पाच पराभव अन् फक्त १ गुण.. कोलकाता नाइट रायडर्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आव्हान संपल्यात जमा झाले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या KKR चा एकंदर खेळ पाहता, ते उर्वरित ८ सामने जिंकणे अवघड आहे. एखादा चमत्कारच त्यांना प्ले ऑफमध्ये घेऊन जावू शकतो. गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात KKR ला दारूण पराभव पत्करावा लागला. GT ने तिसरा विजय मिळवून IPL 2026 Point Table मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
KKR चा संघ आज दोनशेपार सहज जाईल असे वाटत होते, पंरतु शेवटच्या षटकांत GT च्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या आणि कोलकाताला १८० धावांवरच समाधान मानावे लागले. कॅमेरून ग्रीनची ( Cameron Green) खेळी ही आजच्या सामन्यातील KKR साठी सकारात्मक गोष्ट ठरली. ३ बाद ३२ धावांवर संघ अडचणीत असताना ग्रीनने रोव्हमन पॉवेल ( २७) व अनुकुल रॉय ( ९) यांच्यासह अनुक्रमे ५५ (४३) व ६० ( २३) धावांची भागीदारी करून संघाला फ्रंटसीटवर आणले. पण, GT च्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात चांगला मारा केला. रिंकू सिंगने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला.
GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Videoकागिसो रबाडाने ३, तर मोहम्मद सिराज व अशोक शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ग्रीनने ५५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावा केल्या. राशीदने २०व्या षटकात ६ धावा देताना ग्रीनची विकेट मिळवली. ग्रीनची ही आयपीएलमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठऱली. त्याने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना हैदराबादविरुद्ध ४७ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या होत्या. शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी GT ला सकारात्मक सुरुवात करून दिली. अनुकुल रॉयच्या पहिल्या षटकात २० धावा चोपल्या गेल्या. खरं तर तिसऱ्या षटकात सुनील नरीन गोलंदाजीला येणे अपेक्षित होते.
नरीनने त्याच्या दुसऱ्याच म्हणजेच डावातील सहाव्या षटकात KKR ला यश मिळवून दिले. सुदर्शन २२ धावांवर झेलबाद झाला आणि GT ला ५७ धावांवर पहिला धक्का बसला. फॉर्मात परतलेल्या जॉस बटलरने कर्णधार गिलला चांगली साथ दिली. बटलर १५ चेंडूंत २५ धावांवर झेलबाद झाला, पंरतु गिलने एक बाजू लावून धरताना २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गुजरातने १० षटकांत २ बाद ९९ धावा केल्या होत्या.
GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेलाशुभमन याने नंतर वॉशिंग्टन सुंदरसह ( १३) तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ४३ धावा जोडल्या. शुभमनने सामना गुजरातच्या बाजूने पूर्णपणे झुकवला होता आणि आता फक्त विजयाची औपचारिकता राहिली होती. शतकाच्या उंबरठ्यावर असताना शुभमन ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८६ धावांवर झेलबाद झाला. कॅमेरून ग्रीनने अफलातून झेल टिपला आणि गुजरातला अजूनही १८ चेंडूंत २३ धावा हव्या होत्या. ग्लेन फिलिप्स ( १९) व राहुल तेवातिया यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि गुजरातला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
आयपीएल २०२६च्या गुणतालिकेत पंजाब किंग्सन ९ गुणांसह अव्वल स्थानावार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी ८ गुण आहेत आणि ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरात टायटन्सने आज सामना जिंकून ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेताना सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स ( प्रत्येकी ४) यांना मागे सोडले. कोलकाताचा हा ६ सामन्यांतील पाचवा पराभव ठरला आणि ते १ गुणांसह दहाव्या क्रमांकावरच आहेत. आता उर्वरित ८ सामन्यांत त्यांना विजय मिळवून १७ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत राहता येईल. १५ गुणांसहही त्यांना संधी मिळू शकते, पंरतु त्यासाठी इतरांच्या निकालावर विसंबून रहावे लागेल.