मोफत चष्मे वाटप शिबिर
esakal April 18, 2026 10:45 PM

-rat१८p१४.jpg-
26O38136
रत्नागिरी : भाटीमिऱ्या येथील पिंपळवाडीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी संस्थेतर्फे ग्रामस्थांची नेत्रतपासणी करण्यात आली.
-----------
‘जायंट्स’तर्फे मोफत चष्मे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी या सामाजिक संस्थेतर्फे भाटीमिऱ्या येथील पिंपळवाडी, बागकर मंडळ येथे नेत्रतपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर झाले. या उपक्रमासाठी १५० रुग्णांनी नावनोंदणी केली होती. त्यातील शंभरहून रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नूतन सदस्य आणि पुराणिक ब्रदर्स ऑप्टिशियनचे संजय पुराणिक आणि त्यांचे सहकारी प्रसाद तुपे, सार्थक पुराणिक, संजना वीर यांनी विशेष मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष महेश दामले, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भुते आणि बागकर मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमासाठी जायंट्स फेडरेशनचे स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत, संजय पाटणकर, सदस्य सचिन बारटक्के, सुनील सहस्रबुद्धे, विनय जोशी, भरत इदाते, प्रसन्न मुळे या सभासदांचे सहकार्य मिळाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.