पातूर: तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी (ता.१६) अकोला बाल कल्याण समितीला मिळाली. माहिती मिळताच समितीच्या सदस्या प्रांजली मनोज जैस्वाल यांच्या मार्गदर्शनात संबंधित ठिकाणी पोहचून यंत्रणेद्वारे होणारा बालविवाह थांबविण्यात आला.
माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूरकर, सुनील सरकटे यांनी तत्परता दाखवत सदर ठिकाणी भेट दिली. त्याचवेळी पातूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक हनुमंत धोपेवाड यांना देखील सूचना देण्यात आली व त्यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता स्थानकातील सहकारी साईनाथ नवले आणि शंकर बोरकर यांना तत्काळ पाठवले.
Akola News: निधीच्या घोषणेनंतरही ‘ब्रिज’चे काम ठप्प; नऊ वर्षांपासून रखडले काम; ५४ कोटीची घोषणा; प्रत्यक्षात निधी केव्हा मिळणार?त्या गावातील पोलिस पाटील राजेश देशमुख देखील यावेळी उपस्थित होते. सर्व यंत्रणा योग्यवेळी संबंधित ठिकाणी पोहचली आणि सदर विवाह होण्याच्या आधीच थांबवण्यात आला. बालिकेच्या घरी भेट दिल्यानंतर बालिका आणि पालक यांच्यासोबत संवाद साधला. त्यांना बालविवाह अधिनियम २००६ बाबत माहिती दिली आणि दोन्ही कुटुंबियांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह होऊ देणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. बालकल्याण समिती समक्ष उपस्थित झाल्यानंतर ग्रामसेवकांना न्यायालयीन प्रतिबंधात्मक आदेश प्राप्त करण्याकरता आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
कारवाई दरम्याने अकोला बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी बालविवाह थांबवल्यानंतर बालिका तथा तिच्या कुटुंबांचे प्राथमिक संवाद हे साधारणपणे ‘बालिका पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात, पालकांचे कौटुंबिक कलह असल्याकारणाने तिला सांभाळणारे कोणी नाही, शिक्षणात खंड पडला आहे, पालक आजारी आहेत’, अशा प्रकारचे असतात आणि म्हणून विवाह हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे असतो, असे सांगितले जाते.
डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला, ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक विस्कळीत; तर पनवेलमध्ये रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, चौघे अडकलेमात्र, विवाह हा एकमेव पर्याय नाही हे पालकांनी समजून घ्यायला हवे. बालक आणि पालक यांच्यामधील संवाद वाढवायला हवा. बालकांच्या मनातले समज गैरसमज जाणून त्यावर मार्ग काढायला हवा. शिक्षणात खंड पडत असेल तर, पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याकरता प्रयत्न करायला हवा. शिक्षणामध्ये रुची नसेल तर, कौशल्यविकास तथा कलाविकास यावर भर द्यायला हवा. बालकांसाठी कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणा स्वयंसेवी संस्था यांचे देखील सहकार्य घेता येते तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो, परंतु शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास बघता बालिकेचा विवाह हा वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करण्याचे आवाहन त्यांनी केले.
"तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सरपंच यांनी त्यांच्या तालुक्यात बाल विवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. माहिती मिळाल्यास तत्परतेने यंत्रणांना कळवावे. बालविवाहात सहभागी असणाऱ्या सर्वांवर बालविवाह अधिनियम २००६ नुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल."
- पोलिस निरीक्षक हनुमंत डोपेवाड, पोलिस स्टेशन, पातूर