सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा अर्ज फेटाळून लावला. 18 एप्रिल 2025 रोजी डॉ. वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या मनीषा माने-मुसळे विरोधात गुन्हा नोंद केला होता. मागील वर्षभरापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (Shirish Valsangkar)
या गुन्ह्यात आपला संबंध नसल्याचे म्हणत यातून दोषमुक्ती व्हावी यासाठी आरोपी मनीषा माने-मुसळे हिने सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपीला दोषमुक्त करण्यास नकार देत अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आरोपी मनिषा माने-मुसळे हिचे वकील ऍड. प्रशांत नवगिरे यांनी दिली.(Shirish Valsangkar)
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी (18 एप्रिल 2025) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडली. या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली होती.
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले.
लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.
मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले. रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.
आणखी वाचा