अरे हो, शांत हो...! तिलक वर्मा चार्जअप झालेल्या हार्दिक पांड्याला असं का म्हणाला? नेमकं तेव्हा काय घडलं?
esakal April 21, 2026 07:45 PM

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग२०२६ स्पर्धेचा ३० वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने दमदार प्रदर्शन करत हंगामाचा दुसरा विजय मिळवला. सामन्यात तिलक वर्माने दमदार शतक झळकवत या हंगामातील सर्वात मोठा विजय मुंबईला मिळवून दिला. या सामन्यात मुंबईकडून फलंदाजीत तिलक वर्मा तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह दोघेही चमकले.

सलग ४ पराभवानंतर आलेला हा विजय मुंबईसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला. दरम्यान एकाक्षणी उत्साही असलेल्या हार्दिक पांड्याला शांत राहायला तिलकला सांगावे लागले होते. त्याबाबत तिलकनेच माहिती दिली आहे. झालं असं की गुजरातविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली, पण तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी डाव सावरला. तिलकने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०१ धावांची नाबाद खेळी करत संघाला ५ बाद १९९ धावांपर्यंत पोहोचवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव १५.४ षटकांतच १०० धावांवर आटोपला. हा मुंबई इंडियन्सचा धावांच्या फरकाने चौथा सर्वात मोठा विजय ठरला.

सामन्यानंतर तिलक वर्माने जिओहॉटस्टारशी बोलताना एका खास प्रसंगावर भाष्य केलं. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान हार्दिक पांड्या मैदानात आला होता. त्यावेळी तो खूप जोशात होता आणि सतत मला “तू करू शकतोस, तू करशील” असं म्हणत होता. तिलक म्हणाला, “सर्वांनाच माहिती आहे की हार्दिक किती उत्साही आहे. पण मला त्या वेळी शांत राहून माझ्या खेळावर लक्ष द्यायचं होतं. त्यामुळे मी त्याला ‘शांत हो’ असं सांगितलं आणि मी सगळं सांभाळतो असंही म्हटलं.”

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

पुढे तिलक म्हणाला की, गेल्या काही सामन्यांत मला जास्त वेळ फलंदाजी करता आली नव्हती, त्यामुळे या सामन्यात खेळपट्टीवर जास्त वेळ घालवणं हे माझं लक्ष्य होतं. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी करत ४ विकेट घेतल्या. सुरुवातीची ओव्हर टाकण्याचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक ठरला. बुमराहचा फॉर्म परत येणं मुंबई इंडियन्ससाठी मोठी सकारात्मक बाब आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.