चांगले कर्ज विरुद्ध खराब कर्ज नवी दिल्ली : आजकाल मोबाईल हातात घेतल्यानंतर काही मिनिटांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी झाल्यानं अनेकांकडून एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेणे किंवा मोबाईल फोन खरेदीपासून वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज मिळतंय. त्यामुळं कर्जांचं प्रमाणं वाढलं आहे. अगोदर कर्ज काढण्यासाठी बँकांमध्ये किंवा क्रेडिट सोसायटी, पतसंस्थामध्ये जावं लागायचं, कर्ज मंजूर करण्यासाठी जामीनदार द्यावे लागायचे. आता मात्र, कर्जासाठी जामीनदार देखील लागत नसल्यानं कर्ज काढणाऱ्या व्यक्तीला आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीलाच कर्जाच्या रकमेसंदर्भातील गोष्टी माहिती असतात. त्यामुळं कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सर्वांना कर्जासंदर्भात काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.
रिच डॅडच्या फ्रीडम फ्रॉम बॅड डेब्ट या पुस्तकात वाईट कर्जापासून कशी मुक्तता मिळवायची यासंदर्भात विवेचन केलं आहे. काही जण म्हणतात की सर्व प्रकारची कर्ज वाईट असतात मात्र रिच डॅडच्या या पुस्तकानुसार काही कर्ज चांगली असतात तर काही कर्ज वाईट असतात.
चांगलं कर्ज तुमच्या खात्यात पैसे जमा करत, ते तुम्हाला श्रीमंत बनवतं. तर, वाईट कर्ज तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतं आणि तुम्हाला गरीब करतं. या संदर्भातील उदाहरण देऊन तुम्हाला सांगायचं तर चांगलं कर्ज म्हणजे तुम्ही कर्ज काढून घेत एखादी मालमत्ता घेऊन ती भाड्यानं दिली असेल आणि भाडे म्हणून मिळणाऱ्या पैशांतून तुम्ही कर्जाचे हप्ते भरु शकाल आणि तुमचा खर्च देखील भागवू शकाल. वाईट कर्ज असं असतं ज्यातून तुमच्या खात्यातून कर्जाची परतफेड करण्यासाठी रक्कम भरावी लागते.
वाईट कर्जातून बाहेर पडण्यासाठी प्रथम तुम्ही तुमच्यासाठी काही रक्कम ठेवा. पहिल्यांदा ती रक्कम इतर देण्यांसाठी वापरु नका. ती तुमच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करा. तुमच्याकडून होणारे अनावश्यक खर्च टाळा. तुमचं कर्ज वाईट कर्ज याप्रकारात मोडत असेल तर नव्यानं कसलंच कर्ज घेऊ नका. पहिल्यांदा तुमचं आर्थिक गणित बसवा. आर्थिक स्थिती नियंत्रणात आल्यानंतर इतर विचार करा.
वाईट कर्जातून बाहेर यायचं असल्यास तुम्ही स्वत:ला सत्य सांगा आणि वास्तवाचा सामना करा. आपल्यावर किती कर्ज आहे आणि किती परतफेड करायची आहे. तुम्ही वाईट कर्ज घेणं थांबवा. तुमच्यावर असलेल्या कर्जांची यादी करा आणि ती लिहून काढा.यामध्ये सर्व कर्जांचा उल्लेख करा.
तुमच्या सर्व कर्जांची यादी करा, ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमी राहिलेला असेल त्यानुसार त्या कर्जांची परतफेड करा. यानुसार तुमच्यावरील कर्जांची संख्या कमी होतेय ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या नियमित कमाईसह उत्पन्नाचे आणखी काही मार्ग शोधा. त्यातून तुम्हाला अधिकची काही रक्कम मिळेल. सर्व कर्जांची परतफेड झाल्यानंतर तुम्ही दरमहा ती रक्कम गुंतवणूक म्हणून वापरु शकता.
आणखी वाचा