Marathi Breaking News Live Today: बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार संपला असून, शरद पवार यांनी रुग्णालयातून एक भावनिक संदेश देत लोकांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या विरोधात तेवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार संपला असून, शरद पवार यांनी रुग्णालयातून एक भावनिक संदेश देत लोकांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या विरोधात तेवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
एसटीच्या बस स्थानकांचा आणि आगारांचा वीज वापर आता सौरऊर्जेद्वारे भागवला जाणार असून, या महत्त्वाकांक्षी ‘एसटी सौर ऊर्जा प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्याला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
अध्यात्म आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरातच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात खरातविरोधात १५वा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.