शिंदे सोसायटीकडून दोन कोटींचे कर्ज वाटप
esakal April 22, 2026 07:46 PM

आंबेठाण, ता. १८ : शिंदे (ता. खेड) विविध कार्यकारी विकास सोसायटीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जुन्या कर्जाची मुदतीत परतफेड केल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील शेतीकामांसाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास पाचपुते यांनी दिली. शिंदे- वासुली या संयुक्त गावांच्या विकास सोसायटीने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अध्यक्ष रामदास पाचपुते यांच्यासह आनंदा माताळे, मालक पाचपुते, गोरख पाचपुते, मारुती मेंगळे, पांडुरंग पाचपुते आणि बाळासाहेब कलवडे या संचालकांनी विशेष प्रयत्न केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.