पाईट सोसायटीकडून साडेअकरा कोटींचे कर्जवाटप
esakal April 22, 2026 07:46 PM

पाईट, ता. २२ ः पाईट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून खरीप हंगामासाठी एकूण ११ कोटी ५५ लाख सहा हजार रुपयांचे पीककर्जाचे वाटप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या पीक कर्जामुळे सोसायटीच्या सुमारे ११६५ शेतकरी सभासदांना लाभ मिळाला आहे. पाईट सोसायटीचा खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचा प्रारंभ पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्ष दिलीप खेंगले, उपाध्यक्ष दिगंबर जांभळे, पंडित रौंधळ तसेच सोसायटीचे सर्व संचालक, जयसिंग दरेकर व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.