लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या पुलानजीक उभारलेले तात्पुरते पूरक बांधकाम काढण्यासाठी आणि रंगकाम करण्यासाठी गुरुवारी (ता. २३) दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबई वाहिनीवरील तर शुक्रवारी (ता. २४) पुणे वाहिनीवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल केला जाणार आहे.
मुंबई वाहिनीवरील वाहतूक गुरुवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करून सर्व वाहने किवळे, देहू रोडमार्गे कुसगाव टोल प्लाझा येथून मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच पुणे वाहिनीवरील वाहतूक शुक्रवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करून सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून देहू रोड, किवळे येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.