Pune Furniture Scam: कोटेशन देऊन १.५३ लाखांची उकळपट्टी; फर्निचर न बनवता पैशांचा अपहार, फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल
esakal April 23, 2026 03:45 AM

पुणे : घरातील फर्निचर बनवून न देता एका महिलेची एक लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार फुरसुंगी परिसरात उघडकीस आला आहे. फर्निचरचे कोटेशन देऊन रक्कम उकळल्यानंतर काम न करता पैशांचा अपहार केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने (वय ३४, रा. फुरसुंगी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मोहसीन शेख (रा. भवानी पेठ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस त्यांच्या घरातील फर्निचरचे काम करायचे होते. त्यासाठी आरोपी शेख याने त्यांना फर्निचर बनवून देण्याचे कोटेशन दिले होते. या कोटेशनमधील रकमेपैकी एक लाख ५३ हजार रुपये त्याने आगाऊ घेतले.

पैसे घेतल्यानंतर त्याने फर्निचर बनवून देणे अपेक्षित होते, मात्र, त्याने कोणतेही काम केले नाही. फर्निचरचे काम होत नसल्याचे पाहून महिलेने आरोपीकडे दिलेली रक्कम परत मागितली. मात्र, त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून आरोपीने पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.