Akshay Kumar Apology on Duplicate Moustache in Samrat Prithviraj : कोणत्याही चित्रपटात कलाकाराचा फक्त अभिनयच नाही, तर त्याचा लुकही तितकाच महत्त्वाचा असतो,विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांसाठी. साधारण चार वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला, ज्यामधील त्याच्या लुकमुळे प्रेक्षक संतापलेले. या भूमिकेसाठी अभिनेता अक्षय कुमारला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलेलं. चित्रपटात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या नकली मिशांनी. या नकली मिशांमुळे अक्षय कुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्यासोबतच टीकेचाही सामना करावा लागला. आता चार वर्षांनंतर अक्षय या वादावर बोललाय.
हा चित्रपट म्हणजे 2022 मध्ये आलेला सम्राट पृथ्वीराज. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसलेल्या अक्षय कुमार यांनी नकली मिशा लावल्या होत्या. यावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अलीकडेच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे.अक्षय कुमार सध्या भूत बंगला या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमी करताना दिसतोय.
अक्षय कुमारने सांगितलं की, “मी अनेक चित्रपटांवर आणि वेगवेगळ्या लुक्सवर काम करत असतो. सध्या माझी ही दाढी वाढवायला मला सुमारे सहा आठवडे लागले, आणि त्या काळात मी कोणतंही काम केलं नाही.” नकली मिशांबाबत त्याने स्पष्ट केलं, “‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटासाठी कथेनुसार विशिष्ट प्रकारच्या मिशांची गरज होती. पण तशा मिशा माझ्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे नकली मिशांचा वापर करावा लागला. कदाचित त्या प्रेक्षकांना आवडल्या नसतील. शेवटी हे सगळं अभिनयाचा भाग आहे. काही वेळा कलाकारांना असे प्रयोग करावे लागतात. जर प्रेक्षकांना हा लुक आवडला नसेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो.” असं अक्षय म्हणाला.