ठाणे : तुमच्यावर कोणीतरी काळी जादू (Black magic) केलीये, तुम्ही मरणार आहात असा बनाव करुन कसिनो बाबा लोकांना आपल्या जाळ्याl ओढायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. लोकांकडून उकळलेल्या पैशांनी हा कसिनो बाबा गोव्यात जाऊन, कसिनो खेळून फाईव्ह स्टार हॅाटेलची मजा घ्यायचा. पण, आता या बाबाचे बिंग फुटले आणि आता हा बाबा ठाण्यातील (Thane) तुरुंगात जेलची हवा खातोय. कॅप्टन खरात या भोंदूबाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावले आहातच पण कॅप्टन खरातच्याही पुढे बाप निघाला. ठाण्यातील एक भोंदू बाबा. पोलिसां गुडघ्यांवर बसलेला हाच तो भोंदू बाबा जो खरातचाही बाप निघालाय. मंजूनाथ शेट्टी उर्फ दिक्षित बाबा या नावाने हा भोंदू बाबा प्रसिद्ध आहे.
मुंबई, ठाण्यात आणि राज्याबाहेर अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातलाय… तुमच्यावर कोणी तरी काळी जादू केलीये… अघोरी पूजा करुन तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो, तुम्हाला मुल बाळ होईल अशी पूजा करतो. याची भूरळ पाडून या दिक्षित बाबाने ठाणे आणि मुंबईत अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातलाय. दिक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवायचा… आश्चर्य म्हणजे हा बाबा अघोरी पूजा काळी जादू करता जे पैसे पीडितांकडून घ्यायचा ती काळी जादू अघोरी पूजा करायला बाबा गोव्याला जायचा. तिथे पूजा किंवा काळी जादू न करता लुबाडलेले पैसे हा भोंदू बाबा गोव्यातल्या कसिनो मध्ये उडवायचा, त्यात पैसे हरला की पुन्हा नवीन शिकार शोधायचा आणि त्याला जाळ्यात अडकवून पुन्हा कसिनो खेळायला गोव्यात यायचा. एवढंच काय तर रोज रशियन, कझाकिस्तान अशा विविध देशांतील महिला या कसिनो बाबाला लागायच्या, या दिक्षित बाबाचे आणखी एक नाव फेमस आहे ते म्हणजे कसिनो बाबा.
एखादी शिकार गळाला लागली आणि त्याच्याकडून पैसे आले कि हा कसिनो बाबा थाटात महागड्या विमान तिकिटावर प्रवास करुन गोव्यातील फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये थांबायचा…. कसिनोमध्ये याचा थाट एखाद्या लक्ष्मीपुत्राला लाजवेल असा होता. या कसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झाले आणि याला अटक करुन या कसिनो बाबाला ज्या गोव्यातला कसिनोमध्ये रेड कार्पेट असायचे त्याच कसिनोमध्ये या बाबाला पोलिसांनी तपासाकरता नेले आणि कसिनोवाले देखील अवाक झाले. धक्कादायक म्हणजे या कसिनो बाबाने लूबाडलेल्या पैशांनी इतकी अय्याशी केलीये की एका रात्रीत 14 लाख रुपये बील या कसिनो बाबाने केलंय. आता या बाबासोबत गोव्यातल्या कसिनोमधील एक मॅनेजर शामिल होता हे उघड झालंय. या बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये पाठवलेत यांचा शोध घेवून या बाबाचे आणखी काळे कारनामे लवकरच पोलिस उघडकीस करणार असल्याची माहिती आहे.
पवारांचा वारसदार कोण? बारामती विधानसभेसाठी तीन बंधू मैदानात, 2029 च्या निवडणुकांची आत्ताच चाहूल