'आमच्यात कधीच लव्ह अँगल...', रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर विशाल कोटियननं सोडलं मौन, म्हणाला...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 24, 2026 03:43 PM

Vishal Kotian And Ruchita Jamdar Relationship: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi) 17 स्पर्धकांमुळे प्रचंड चर्चेत आला होता. या रिअॅलिटी शोची विनर तन्वी कोलते (Bigg Boss Winner Tanvi Kolte) ठरली. टॉप 3 स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सिझनमध्ये राखी आणि राकेश बापटनंतर विशाल कोटियन आणि रुचिता जामदार (Ruchita Jamdar) ही जोडी प्रेक्षकांमध्ये चर्चेत आली. दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू आहे का?  असा प्रश्न अनेकांना पडला होता.  अशातच बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियनने (Vishal Kotian) यावर भाष्य केलं आहे.  रुचिता जामदारसोबत रिलेशनशिप होते का? दोघांमध्ये लव्ह अँगल होता का? यावर त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. 

बिग बॉसच्या घरात रुचिता आणि विशालच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा रंगली होती. रुचिताने एका एपिसोडमध्ये अनुश्रीकडे प्रेमाची कबुली दिली होती. तर, विशालने रुचिता आवडते, असं म्हटलं होतं. विशालने अलिकडेच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील किस्से आणि रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. विशाल म्हणतो, 'रुचिता जामदारसोबत माझी चांगली मैत्री होती. आम्हा दोघांमध्ये  15 वर्षांचा फरक आहे', असं त्यानं मुलाखतीत सांगितलं.

'आमच्यात कधीच लव्ह अँगल नव्हता' (Vishal Kotian on Ruchita jamdar)

'तिची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. ती मराठी बोलायची नाही, तिची भाषा मला कधी कळली नाही. चिपांटे, टवळे असे ती शब्द वापरायची. ही  भाषा मी कधी ऐकली नाही.  खरंतर मी मुंबईचा आहे. त्यामुळे मी हे शब्द कधी ऐकले नाहीत. आमचा एकमेकांवर विश्वास होता.  पण कधीच आमच्यात लव्ह अँगल नव्हता',  असं विशालने स्पष्ट केलं.

'आमचं नातं मैत्रीच्या पलिकडे नव्हतं' (Ruchita jamdar on Vishal Kotian Relationship)

आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुचिताने मुलाखतीत विशालबाबतीत आणि त्यांच्यातील नात्याबाबतीत भाष्य केलं  होतं. रुचिता म्हणते,  'आमच्यात बरंच बोलणं व्हायचं. जेव्हा संस्कृती आली, तेव्हा त्याने, ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करते, असं म्हणाला होता. इन्फ्लुएंस होऊन आपलं नातं का तोडते? असंही म्हणाला होता. आमच्यात मैत्रीपलिकडे काही नव्हतं', असं रुचिताने मुलाखतीतून स्पष्ट केलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'महाराज मला शिक्षा देतात, तेव्हा...'; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महाराज ज्याचा शिरच्छेद करतात 'तो' रंगोत्री कुणी साकारलाय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.