RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा
Tv9 Marathi April 25, 2026 07:45 AM

अनुभवी फलंदाज विराट कोहली याने केलेल्या 81 धावांच्या चाबूक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 34 व्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात केली आहे. गुजरातने आरसीबीसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 7 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 18.5 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या. आरसीबीचा घरच्या मैदानातील अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममधील हा 50 तर या मोसमातील एकूण पाचवा विजय ठरला. आरसीबी यासह या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सनंतर 5 सामने जिंकणारी तिसरी टीम ठरली.

साई सुदर्शनचं शतक

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी बोलावलं. गुजरातने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये स्कोअरबार्डवर 3 विकेट्स गमावून 205 धावसंख्या नोंदवली. गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या साईने शतक झळकावलं. साईने 100 धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल याने 32 धावा जोडल्या. जोस बटलर याने 25 धावांचं योगदान दिलं. वॉशिंग्टन सुंदर (19) आणि जेसन होल्डर (23) दोघे नाबाद परतले. आरसीबीसाठी जोश हेझलवुड, भुवनेश्वर कुमार आणि सुयश शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1- 1 विकेट मिळवली.

आरसीबीची बॅटिंग

गुजरातची वॉशिंग्टन सुंदर याच्या चुकीमुळे पहिल्याच ओव्हरमध्ये विराट कोहली याच्या सर्वात मोठी विकेट मिळवण्याची संधी हुकली. सुंदरने आरसीबीच्या डावातील पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या तर विराटच्या खेळीतील पहिल्या बॉलवर कॅच सोडला. सुंदरने विराटचा कॅच सोडला तेव्हा विराट झिरोवर होता. विराटने या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि आरसीबीच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली.

स्कोअरकार्ड

वॉशिंग्टन सुंदरकडून विराटला जीवनदान

विराटने 44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 8 फोरसह 81 रन्स केल्या. विराटच हे 66 वं अर्धशतक ठरलं. विराट व्यतिरिक्त देवदत्त पडीक्कल याने 55 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही योगदान देत आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. आरसीबीच्या विजयात विराट आणि देवदत्त व्यतिरिक्त जेकब बेथल (14), कॅप्टन रजत पाटीदार (8), जितेश शर्मा (10), टीम डेव्हिड (10)* आणि कृणाल पंड्या याने (23)* धावांचं योगदान दिलं. गुजरातसाठी राशिद खान याने 2 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि मानव सुथार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.