बीड: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सुदर्शन व प्रतीक घुले यांच्यासह अन्य बीडच्या कारागृहात आहेत. या कारागृहातील अनेक कारनामे, आरोपींना मिळणारी व्हीआयपी सुविधा, वाल्मीक कराडच्या गुंडांकडून इतर कैद्यांना मारहाण असे प्रकार समोर येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी अझहर पठाण नावाच्या कैद्याने सुदर्शन व प्रतीक घुले यांनी आपल्या जबर मारहाण केल्यासह कारागृहासंदर्भात ऑडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर लागोपाठ तीन ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृहात नेमके चालले आहे काय, असा प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहे.
पठाणच्या पहिल्या ऑडिओमधील दाव्यांनी खळबळ उडाल्यानंतर काल दुसरा ऑडिओ समोर आणून त्याने ‘यू टर्न’ घेतला होता. वाल्मीक कराड याला बदनाम करण्यासाठी व मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक असल्यामुळे आपल्याला तो ऑडिओ कारागृहातील एक कर्मचारी, सनी आठवले आणि परभणे यांनी दिंडकर यांच्या निरोपावरून करायला लावला होता, असे सांगत पलटी मारली होती.
Pune Firing Incident : पुण्यातील वारजे भागात थरार! सलूनमध्ये केस कापत असतानाच गोळीबार; साहिल राऊतला जागीच ठोकल्या बेड्या, पाच जणांची पटली ओळखमात्र, अझहर पठाण याने ऑडिओमध्ये ज्या सनी आठवले या कैद्याच्या नावाचा उल्लेख केला, त्याचा एक कथित ऑडिओ आज व्हायरल झाला आहे. यात अझहर पठाणला वाल्मीक कराड गँगमधील सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी खरेच मारहाण केल्याचा दावा त्याने केला आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण कारागृह प्रशासन हे वाल्मीक कराडच्या इशाऱ्यावर चालते. इथे सायंकाळी सहानंतर कैद्यांना बराकीच्या बाहेर सोडले जाते, रात्री उशिरा चिकनच्या पार्ट्या केल्या जातात, असा दावा सनी आठवलेने केला आहे.
‘कारागृहात वाल्मीकची दहशत’वाल्मीक कराड याची कारागृहात दहशत आहे. पोलिसही त्याला मदत करतात. सगळ्या जेलमधील डिश टीव्ही बंद असताना वाल्मीकसाठी नवा डिश टीव्ही, सेटअप बाॅक्स लावण्यात आला आहे. अझहर पठाणने त्याच्या ऑडिओमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला, पण माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कारागृहात वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकारी कैद्यांची मोठी दहशत आहे. कारागृह प्रशासन हे त्यांच्या सांगण्यावर आहे. वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना पैसे, मोबाइल पुरवले जातात. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. इथे कोणी चौकशीला आले तर मी सगळी माहिती द्यायला तयार आहे, असेही या ऑडिओमध्ये सनी आठवले एका महिलेशी बोलताना सांगत आहे.
No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच ‘अजहर पठाणवर दबाव’अजहर पठाणवर दबाव आणला जात आहे. त्याला खरेच मारहाण झाली आहे. आता त्याने सगळे दावे बदलले आहेत. वाल्मीक कराडला बंदी असताना रात्री साडेआठला बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे. रात्री नऊला बॅराक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले. सगळे अधिकारी त्याच्यावर दबाव आणत आहेत. बाहेर तुला पैसे देतो, अशी वाल्मीक कराडने लालूच दिल्याचा दावा सनीने या कथित ऑडिओमध्ये केला आहे. अझहर पठाणने लिहिलेल्या चिठ्ठीवरही सनी आठवलेने संशय व्यक्त केला. जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
दक्षता समितीकडून झाडाझडतीबीड जिल्हा कारागृहातून सलग तीन दिवस ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत, शुक्रवारी पुणे येथील जेल दक्षता समितीने कारागृहात धडक दिली. या चार ते पाच सदस्यीय उच्चस्तरीय पथकाने दिवसभर मुक्काम ठोकून कारागृहाच्या कारभाराची कसून चौकशी केली. क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या सर्व कैद्यांची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. कारागृहात मोबाइल पोचलेच कसे आणि प्रशासकीय यंत्रणेत कुठे त्रुटी आहेत, याची तांत्रिक तपासणीही पथकाने केली. समिती आपला गोपनीय अहवाल वरिष्ट पातळीवर सादर करणार आहे.