विधान परिषद निवडणूक; कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळ? भाजपाकडून नागपूरमधील 'या' तीन नावाची चर्चा...
esakal April 25, 2026 03:45 PM

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. नागपूर जिल्ह्यातून भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांची नावांची शिफारस थेट दिल्ली दरबारी केली आहे. त्यात भाजपचे शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी, ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि विदर्भाचे संघटन महामंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या शिफारशीमुळे जिल्ह्याला विधान परिषदेत नवा आमदार मिळण्याची शक्यता बळावली आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. त्यामुळे आता दिल्लीतून कोणाच्या नावाची घोषणा होते आणि या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Jaykumar Gore: सातारा झेडपीच नव्हे; जिल्हा बँकही ताब्यात घेणार: मंत्री जयकुमार गोरे, मुलाखतीत नेमकं काय म्हणाले.. पोतदार यांची भक्कम बाजू

नागपूर ग्रामीणचे माजी अध्यक्ष असलेले डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे समजते. सावनेर विधानसभा मतदारसंघात आशिष देशमुख यांच्यासाठी आपली उमेदवारी सोडण्याचा निर्णय घेत त्यांनी पक्षशिस्त पाळली होती. सुनील केदार यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोतदार यांच्या नावाचा आग्रह धरल्याचीही चर्चा आहे.

कोठेकर यांचे मोलाचे योगदान

भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन महामंत्री म्हणून डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी विदर्भातील संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान दिले आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ त्यांना चांगलीच ठाऊक असल्याने त्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Kolhapur Mayor :कोल्हापुरात भाजपचा पहिला महापौर आज ठरणार, उपमहापौरपद 'जनसुराज्य'ला? उपमुख्यमंत्री शिंदे-कोरे यांच्यात चर्चा तिवारींची बलस्थाने

दयाशंकर तिवारी हे भाजपचे निष्ठावान आणि कट्टर हिंदुत्त्ववादी चेहरा म्हणून ओळखले जातात. महापालिकेचे महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी शहराच्या राजकारणावर पकड मजबूत केली आहे. चार दशकांपासून पक्षासाठी झटणारे तिवारी हे संघटनेतील अनुभवाच्या जोरावर प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.