APMC news : हळदीचा प्रश्न पेटला! सर्वात मोठं मार्केट ४ दिवस बंद; खरिपाच्या तोंडावर बळीराजा मेटाकुटीला
Saam TV April 25, 2026 11:45 PM

Hingoli turmeric market closure impact on farmers : दिवसाला २५०० क्विंटल हळदीची उलाढाल होणाऱ्या हिंगोली बाजार समितीवर आज बंदची वेळ आली आहे. बाजार समितीच्या यार्डमध्ये शेड नसल्याने आणि व्यापाऱ्यांनी माल न उचलल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शेतात राबून पिकवलेली हळद विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला आता रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. पेरणीसाठी पैसे कोठून आणायचे? असा सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

"मराठवाड्यातील हळदखरेदीचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता बंद करण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजार समितीच्या यार्डमधून वेळेत उचलला नसल्याने, शेतकरी आपली हळद न विकताच घरी परतले आहेत.

Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास १ तासाने कमी होणार, ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू

या बाजारसमितीमध्ये दररोज सरासरी २५०० क्विंटल हळदीची आवक होते; मात्र खरेदी झालेला माल व्यापारी वेळेवर उचलत नसल्याने पुढील चार दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या रिकाम्या जागेत शेड उभारण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे अनेक वर्षांपासून निधीची मागणी करत आहे.

महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा; १५ मिनिटांत ६ कोटींच्या सोन्यासह रोकड लंपास

मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीतील शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेली हळद विकण्याऐवजी ती पुन्हा घरी नेऊन साठवून ठेवावी लागत असल्याने, खरिपाच्या पेरणीची तयारी कशी करायची? असा संतप्त सवाल शेतकरी आता लोकप्रतिनिधी आणि सरकारला विचारत आहेत."

४ गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन अन् १२ पानाची सुसाइड नोट; साखरपुड्यानंतर इंजिनीअरनं सरड्यासारखा रंग बदलला, २६ वर्षाच्या तरुणीची आत्महत्या
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.